बीड : पैठण सावळेश्वर येथे शेततळ्यात बुडून ३ मुलांचा मृत्यू | पुढारी

बीड : पैठण सावळेश्वर येथे शेततळ्यात बुडून ३ मुलांचा मृत्यू

केज, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पैठण सावळेश्वर येथे तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (दि. २१) उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या बाबतची माहिती अशी की, आज केज पासून १५ कि. मी अंतरावर असलेल्या पैठण (सावळेश्वर) येथे स्वराज जयराम चौधरी (वय ९ वर्ष), पार्थ श्रीराम चौधरी(वय ८ वर्ष), श्लोक उर्फ कानिफनाथ गणेश चौधरी (वय ६ वर्ष) येथील शेततळ्यात आंघोळीसाठी गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे आणि त्यांचे सहकारी हे घटनास्थळी हजर झाले. त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी युसुफवडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. दरम्यान त्या तिघांही अल्पवयीन भावावर एकत्र अंत्यविधी करण्यात आले. ही घटना नेमकी कशी घडली, याचा शोध युसुफवडगाव पोलीस करत आहेत.

            हेही वाचलंत का ?

Back to top button