

धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर तालुक्यात आज (दि. १८) दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारपीट पडून ज्वारी, गहू ,हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी महागाईमुळे अडचणीत आला असताना त्यात गारपिटीने आणखी भर टाकली आहे. प्रशासनाने गारपीटीचे पंचनामे करून शेतकऱ्याला तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
तालुक्यात शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. दुसऱ्या दिवशीही धारूर तालुक्यातील भोगलवाडी, चोरंबा, हिंगणी, सोनीमोहा, मोहखेड, आदी गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला. यामध्ये आंबा, फळबाग, गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. बहुतांश पिके काढणीला आलेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरवला आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहेत.
हेही वाचा