नांदेड : भावाच्या अंत्यदर्शनाला आलेल्या बहिणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू | पुढारी

नांदेड : भावाच्या अंत्यदर्शनाला आलेल्या बहिणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अर्धापूर, पुढारी वृत्तसेवा : भारतीय संस्कृतीत बहीण-भावाच्या नात्याला पवित्र व प्रेमळ मानले जाते. वेड्या बहिणीची वेडी माया या चित्रपटातील गीताप्रमाणे भावा बहिणीच्या प्रेमळ आणि एकमेकाला जीव लावणाऱ्या नात्याचा प्रत्यय अर्धापुर येथे आला. मोठया भावाच्या निधनाचा धक्का सहन न झालेल्या बहिणीचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना अर्धापुर येथे घडली.

भावाच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या बहिणीने माहेरीच आखेरचा श्वास घेतला. शहरातील अहिल्यादेवी नगरातील नामदेव यादोजी साखरे (वय ८५) यांचा मंगळवारी (दि.१४) मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांची बहिण मथुराबाई संभाजी बोरकर (वय ८०, रा. कोर्टा, ता.वसमत, जि. हिंगोली) यांना देण्यात आली. मथुराबाई या भावाच्या अंत्यदर्शनासाठी बुधवारी सकाळी आल्या होत्या. भावाचा मृतदेह पाहताच त्यांना मोठा धक्का बसला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. तर नामदेव साखरे यांच्या पश्चात पाच मुली, दोन मुले असा परिवार आहे.

हेही वाचा : 

Back to top button