

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून वडजी येथे वीज कोसळून दोन बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आडुळ मंडळात सर्वाधिक १७ मीमी पावसाची नोंद झाल्याची माहिती नायब तहसीलदार गिरजाशंकर आवळे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी सायंकाळपासून पैठण तालुक्यातील विविध भागात जोरदार वादळवाऱ्यासह, विजेच्या कडकडाटासह गारांचा अवकाळी पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसामुळे रबी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, या पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच वडजी येथे अवकाळी पावसामुळे वीज कोसळून परमेश्वर तुळशीराम गोजरे या शेतकऱ्याचे दोन बैल मृत्युमुखी पडले. आज (दि. ७) तहसील कार्यालयात पैठण ११, पिंपळवाडी पीं ३, बिडकीन ६, ढोरकीन (नोंद नाही) बालनगर ५, नांदर १,आडुळ १७, पाचोड १, लोहगाव १०,विहामांडवा २ मी.मी पावसाची नोंद झाली आहे.