धाराशिव : ठाकरे सेनेच्या वतीने महागाईची होळी पेटवून भाजपा सरकारचा निषेध | पुढारी

धाराशिव : ठाकरे सेनेच्या वतीने महागाईची होळी पेटवून भाजपा सरकारचा निषेध

धाराशिव – पुढारी वृत्तसेवा – स्वयंपाकाच्या गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत झालेली भरमसाठ वाढ आणि शेतीमालाच्या किंमतीची घसरण होत असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महागाईची होळी पेटवून केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. पन्नास खोके.. एकदम ओके…च्या घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी बोलताना आमदार कैलास पाटील म्हणाले की, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले असताना शेतकर्‍यांचीही सरकारकडून लूट होत आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्यामुळे शेतीमाल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कांद्याला हमीभाव देण्यात यावा. त्याचबरोबर नाफेडमार्फत हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होऊ दे, असे साकडे आ. पाटील यांनी तुळजाभवानी चरणी घातले. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून निषेध केला.

आंदोलनात आमदार कैलास घाडगे पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, जि.प.चे माजी सदस्य दीपक जवळगे, प्रवीण कोकाटे, सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, रवी वाघमारे, पंकज पाटील, दत्ता बंडगर, बंडू आदरकर, राजाभाऊ पवार, तुषार निंबाळकर, राणा बनसोडे, अक्षय ढोबळे, प्रदीप घोणे, गणेश खोचरे, दीपक जाधव, सुरेश गवळी, मनोज केजकर, अजय नाईकवाडी, आश्रुबा मुंडे, गफूर शेख, मुजीब काझी, अमीर शेख, साजीद शेख, राकेश सूर्यवंशी, सतीश लोंढे, कलीम कुरेशी, नरसिंग मेटकरी, सह्याद्री राजेनिंबाळकर, जगदीश शिंदे, अमित जगधने, संदीप शिंदे, सुमित बागल, अभिजित देशमुख, सौदागर जगताप, अमोल मुळे, पांडुरंग माने, गणेश साळुंके, मंगेश काटे, संदीप गायकवाड, प्रवीण केसकर, राकेश कचरे, बाळासाहेब दंडनाईक, सुनील वाघ, अक्षय जोगदंड, शिवयोगी चपणे, शिवप्रसाद कोळी, बालाजी कांबळे, महादेव जाधव, आप्पा भोसले, महेश उपासे, शाहबाज पठाण, अण्णा तनमोर, बबलू जाधव, अमर शिंदे, अमोल कांबळे, रोहित कदम, अजित बाकले, राम पवार सहभागी झाले होते.

Back to top button