इम्रान खान आज कोर्टासमोर हजर होणार | पुढारी

इम्रान खान आज कोर्टासमोर हजर होणार

इस्लामाबाद :  माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेसाठी त्यांच्या निवासस्थानी सोमवारीही पोलिस दाखल झाले होते, घराची झडतीही पोलिसांनी घेतली; पण इम्रान घरी नसल्याने पोलिसांना परतावे लागले. इम्रान हे मंगळवारी न्यायालयासमोर हजर राहतील, असे त्यांच्या वकिलांनी पोलिसांना सांगितले.

इस्लामाबाद न्यायालयाने इम्रान यांना अटक करण्याचे आदेश दिलेले नाहीत. त्यांना 7 मार्चपर्यंत न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितलेले आहे, असे पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे उपाध्यक्ष आणि माजी परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी माध्यमांना सांगितले. इम्रान यांनी तीनवेळा हजेरी टाळलेली आहे.

Back to top button