हिंगोली : औंढा नागनाथ येथे ३८ किलो पकडला गांजा; तिघांना अटक | पुढारी

हिंगोली : औंढा नागनाथ येथे ३८ किलो पकडला गांजा; तिघांना अटक

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा: औंढा नागनाथ येथील विश्रामगृहाजवळ एका कारमधून ३८ किलो गांजा पोलिसांनी जप्त करत तिघांना अटक केली. शेख गौस शेख पाशा (वय ३२, वाहन चालक, रा. मस्तानपुर, तालुका पुर्णा, जिल्हा परभणी), रवींद्र अमरसिंग राठोड (रा. कृष्णा, तालुका जिल्हा वाशिम) आणि शेख मेहुद्दीन शेख अल्लाउद्दीन (वय ३६, रा. भीमवाडा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी ) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी की, परभणी जिल्ह्यातून एका वाहनांमधून गांजा औंढा नागनाथ येथे येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या भागात सापळा लावला होता. शेख गौस, रवींद्र राठोड आणि शेख मेहुद्दीन हे आज शुक्रवारी (दि.३) रोजी कारमधून (क्रमांक एमएच १२ के एन २१६० ) गांजासह येत होते. याचदरम्यान पोलिसांनी तिघांना अटक करून ३८ किलो ६०० ग्रॉम म्हणजे, अंदाजे ९ लाख ६५ हजार रुपये आणि वाहनासह १४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला. याबाबत औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदरीची कार्यवाही पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवशंभ घेवारे यांनी कारवाई केली आहे. यामध्ये जमादार संभाजी लेखोळे, गजानन पोकळे, ज्ञानेश्वर पायगन, गणेश लोकरे, तुषार ठाकरे, प्रशांत वाघमारे, रविकांत हरकळ, गजानन गिरी, पंजाब थिटे यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

हेही वाचा : 

Back to top button