पोटनिवडणूक हरणारे राज्य जिंकतात, हा इतिहास: एकनाथ शिंदे | पुढारी

पोटनिवडणूक हरणारे राज्य जिंकतात, हा इतिहास: एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पोटनिवडणूक हरणारे राज्य जिंकतात, हा इतिहास आहे. कसबा म्हणजे संपूर्ण राज्य नव्हे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावर दिली. ते विधानसभेत बोलत होते.

दावोस दौऱ्यावर सरकारने पैशांची उधळपट्टी केल्याच्या राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.३) सभागृहात उत्तर दिले. दावोसमध्ये केवळ ३० ते ३५ कोटींचा खर्च झालेला आहे. पण हा खर्च वाया गेलेला नाही. दावोसमध्ये करार झालेल्या कंपन्यांना महाराष्ट्रात जागा देण्यास सुरूवात झाली आहे. दावोसमध्ये महाराष्ट्राचा उदोउदो सुरू होता, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील मागील सरकारने १० हजार कोटींचीही गुंतवणूक आणली नाही. पण आमच्या सरकारने मोठ्या प्रमाणात उद्योग आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. नाफेडकडून कांदा खरेदी सुरू झाली आहे.

राज्य सरकार आरोग्यवर ही लक्ष देत आहे. समृध्दी महामार्गामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहे. तसेच तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झालेली आहे. मुंबईत मेट्रोच्या कामांना गती देण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दुप्पट मदत करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असून महाराष्ट्राचे एक वेगळे चित्र देशापुढे पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे शिंदे यांनी सांगितले. एमपीएससीचे सर्व प्रश्न सोडवत आहे. आत्मक्लेष केला असे काही बोललो नाही, असे विरोधकांना देशद्रोही म्हटल्याच्या विधानावरून शिंदे यांनी अजिक पवार यांना टोला लगावला.

हेही वाचा 

Back to top button