हिंगोली : प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, प्रियकरासह पत्नी पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

हिंगोली : प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, प्रियकरासह पत्नी पोलिसांच्या ताब्यात

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : आखाडा बाळापूर जवळील बायपासवर मृतदेह सापडलेल्या शेख शकील शेख खाजा याचा प्रियकाच्या मदतीने खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याची पत्नी व तिचा प्रियकर यांना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी (दि. २८) ही घटना घडली होती.

शेख शकील शेख खाजा ( वय ३५ ) या तरुणांच्या पत्नीसोबत डोंगरकडा येथील मोहसीन याचे अनैतिक संबंध बऱ्याच दिवसापासून होते. याबाबतची महिती पती शेखला मिळाल्यानंतर तो अर्धापूर येथे राहायला गेला होता. परंतु, त्यानंतरही मोहसीनने त्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध सुरूच ठेवले होते. यामुळे शकील सदैव तणावात राहत असल्याची माहिती मयत शेखची बहीण यास्मिन शेख वसीम हिने बुधवार (दि.१) रोजी आखाडा बाळापूर पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी लगेच मयत शेखची पत्नी फुलमा हिला ताब्यात घेतले. रात्री उशिराने डोंगरकडा येथून पत्नीचा प्रियकर मोहसीन यास पोलिसांनी ताब्यात घेऊन आखाडा बाळापूर येथे आणले आहे. खून कसा केला आहे? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

यादरम्यान मयत शेख शकील याच्या मृत्तदेहाचे शवविच्छेदन केले असता त्याच्या डोक्यावर आणि पायावर मारहाणीच्या खोलवर खुणा दिसत होत्या. तसेच त्याचा गळा दाबून खून केल्याचे वैद्यकीय तपासणी समोर आले आहे. यावरून आणि मताच्या बहिणीच्या तक्रारीवरून फुलमा नंतर तिचा प्रियकर मोहसीन ताब्यात घेवून दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी सहा महिन्याच्या अगोदर मोहसीनने शेखला मारहाण केली होती. शेख शकील मंगळवारी त्याच्या आईला भेटण्यासाठी आखाडा बाळापूरला आला होता. रात्री साडेसात नंतर तो घरातून बाहेर निघून गेल्यानंतर रात्रीच्या गस्तीमध्ये पोलिसांना शेख शकीलचा मृत्तदेह हनुमान नगरजवळ असलेल्या बायपास रस्त्यावर मिळून आला होता. यानंतर पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात शेखचा मृत्तदेह शवविच्छेदनासाठी दाखल केला होता.

हेही वाचा : 

Back to top button