

नांदुर फाटा; पुढारी वृत्तसेवा : बीड तालुक्यातील धावज्याचीवाडी पाटीजवळ केजहून बीडकडे निघालेल्या एका कारने समोरून रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचाला जोराची धडक दिली. अपघातानंतर पादचाऱ्याचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या पादचाऱ्याचे नाव आश्रुबा हरीभाऊ भोसल (वय ७० वर्षे) असे आहे.
याबाबतची माहिती अशी की, केजहून बीडकडे निघालेल्या कार (क्र. MH ०२ EE ६७२७ )ने धावज्याचीवाडी पाटीजवळ आल्यावर समोरून रस्ता ओलंडणाऱ्या आश्रुब भोसले याना जोरदार धडक दिली. यात ते वीस- तीस फुटांवर रस्त्यावर फेकले गेल्याने त्याच्या डोक्याला मार लागला. यानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
हा अपघात रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. गावातील दोन तरुणांनी अपघातानंतर कारचा पाठलाग करून नेकनुरजवळ चालकाला पकडण्यात आले. दरम्यान आश्रुब भोसले यांचे नातेवाईक त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच भोसले यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे धावज्याचीवाडी नागरिकामध्ये शोककळा पसरली आहे.
हेही वाचा :