परभणी: कापसाला १२ हजार हमीभाव द्या; ‘वंचित’चे धरणे आंदोलन | पुढारी

परभणी: कापसाला १२ हजार हमीभाव द्या; 'वंचित'चे धरणे आंदोलन

मानवत: पुढारी वृत्तसेवा : कापसाला १२ हजार प्रतिक्विंटल प्रमाणे हमीभाव द्यावा. तसेच वीजबिलमधील अतिरिक्त दरवाढ रद्द करावी, या मुख्य मागणीसाठी आज (दि. २४) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.

मानवत येथील तहसिल कार्यालयावर भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष धम्मपाल सोनटक्के व वंचितचे तालुकाध्यक्ष अॅड. दिगंबर घुगे यांच्या नेतृत्वाखाली धरणे धरून तीव्र निदर्शने करण्यात आली. तहसीलदार प्रतीक्षा भुते यांना मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. या आंदोलनात जिल्हा सचिव तुकाराम भारती, उत्तम लांडगे, मंदाकिनी राठोड, मदन आवचार, बापूराव धबडगे, शेख समदंर, मारोती तूपसमुंद्र, गौतम साळवे, वंदना गायकवाड, गुंडीबा हरणे, हरिभाऊ पंडित, भगवान सरवदे, शिवाजी लाटे यांच्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा 

Back to top button