परभणी: लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाली बारव

पूर्णा: पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील गौर येथे श्री सोमेश्वराचे पुरातन महादेवाचे मंदिर आहे. या मंदिर समोरील शिवध्वज परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला . महाशिवरात्री निमित्त येथे दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी महाशिवरात्रीनिमित्त सायंकाळी मंदिर परिसर व बारवेमध्ये दिवे लावून उत्सव साजरा करण्यात आला. या लक्ष दिव्यांनी बारव उजळून निघाली.
श्री सोमेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होती. सकाळपासून अभिषेक सुरू होते. सायंकाळी गावातील महिलांनी परिसरात दीपोत्सव साजरा केला. मंदिर परिसरात व पुरातन बारवमध्ये दिवे लावण्यात आले. लक्ष दिव्यांनी ही बारव उजळून निघाली. हा नयनरम्य सोहळा परिसरातील नागरिकांनी अनुभवला.
हेही वाचा
- परभणी: गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
- परभणी : पाण्याअभावी पिके करपली; जायकवाडी धरणातून ताडकळस मायनरला पाणी सोडण्याची मागणी
- परभणी : धाकट्या मुलीने दिला आईच्या पार्थिवाला मुखाग्नी!