औरंगाबाद : गावतांडा येथे अफूच्या शेतीवर छापा; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

औरंगाबाद : गावतांडा येथे अफूच्या शेतीवर छापा; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावतांडा परिसरात अफूची लागवड केलेल्या शेतीवर पोलिसांनी छापा टाकून सुमारे तीन लाख रुपये किमतीची आपुचे झाडे जप्त केली. पैठण विभागाचे डीवायएसपी डॉ.विशाल नेहुल व पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष माने यांच्या पथकाने आज (दि.२३) ही कारवाई केली.

गावतांडा परिसरात अफूच्या झाडाची शेती केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पैठण विभागाचे डीवाएसपी नेहुल व सपोनि माने, गोपनीय शाखेचे अभिजीत सोनवणे यांच्यासह पथकाने सदर शेतामध्ये छापा टाकून अफूचे झाडे जप्त केली. नायब तहसीलदार गिरजाशंकर आवळे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जप्त करण्यात आलेली अफूची झाडे सुमारे तीन लाख रुपयांची असल्याची माहिती डीवायएसपी नेहुल यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button