परभणी : प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचे आर्थिक शोषण थांबावे : प्रा. अनंत गोलाईत | पुढारी

परभणी : प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचे आर्थिक शोषण थांबावे : प्रा. अनंत गोलाईत

मानवत; पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नगरपालिका प्रशासनाच्यावतीने आकारण्यात येणारे विविध शुल्क वसुली तात्काळ थांबवून नियमानुसार लाभार्थ्यांना योजनेचे हप्ते वाटप करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश चिटणीस प्रा. अनंत गोलाईत यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना याबाबतचे बुधवारी (ता. २५) रोजी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात ‘मानवत नगरपालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना कार्यालयीन, विकास व प्रशासन शुल्क आणि मालमत्ता कर असे एकूण १२५०० रुपयांची आकारणी केली जात आहे. सदरील योजनेचे लाभार्थी हे आर्थिक दुर्बल घटकातील असल्याने ते हे शुल्क भरू शकत नाही. तरी नगरपालिकेने फक्त मालमत्ता कराचीच वसुली करून अन्य शुल्क माफ करावे. तसेच अनेक लाभार्थ्यांचे हप्ते शासनाकडे थकीत असून सदरील हप्ते तात्काळ अदा करावेत’ असेही त्यात म्हटलं आहे.

हेही वाचा : 

Back to top button