बीड: पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून; पती पोलिसांच्या ताब्यात

केज: पुढारी वृत्तसेवा: गळ्यावर कुऱ्हाडीचा वार करून पत्नीचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. ही घटना केज तालुक्यातील ढाकेफळ येथील चौसा वस्तीवर आज (दि. ७) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आरती भगवान थोरात (वय २७) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर भगवान शाहूराव थोरात असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे. भगवान स्वतः युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
हेही वाचा
- बीड : अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, दिरांकडून भावजयीवर अत्याचार
- बीड : जिल्हा शल्यचिकित्सकांकडून गेटवरच हजेरी; लेट लतीफ कर्मचाऱ्यांची तारांबळ
- बीड : चुलीवर चहा करताना भाजून ९० वर्षीय वृद्धेचा मृत्यू