बीड : चुलीवर चहा करताना भाजून ९० वर्षीय वृद्धेचा मृत्यू | पुढारी

बीड : चुलीवर चहा करताना भाजून ९० वर्षीय वृद्धेचा मृत्यू

केज ; पुढारी वृत्‍तसेवा केज तालुक्यातील टाकळी येथे चुलीवर चहा करताना भाजल्याने एका वृद्धेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी केज पोलिस स्‍टेशनमध्ये आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.

या बाबतची माहिती अशी की, टाकळी ता. केज येथे सरुबाई विश्वनाथ बारगजे (वय ९०) या चुलीवर चहा बनवीत होत्‍या. यावेळी त्‍यांच्या लुगड्याचा पदर चुलीतील जाळावर पडल्‍याने साडीने पेट घेतला. त्यात त्‍या गंभीर भाजल्‍या गेल्‍या. त्‍यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्‍यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी नितीन सुंदरराव बारगजे यांच्या माहिती वरून दि. ३ फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्‍यूचा नोंद करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल शेख हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button