रुग्णवाहिकेचा अपघात
रुग्णवाहिकेचा अपघात

हिंगोली : पतीस उपचारासाठी नेताना रुग्णवाहिकेचा अपघात; पती-पत्नीचा मृत्यू

Published on

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा औंढा नागनाथ मार्गावरील आंबा चौंडी फाट्याजवळ काल (सोमवार) मध्यरात्री रुग्णवाहिका व ट्रकचा भीषण आपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला, तर रुग्णवाहिका चालकासह ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.

"मध्यरात्री वसमत औंढा नागनाथ मार्गावरील आंबा चौंडी फाट्याजवळ रुग्णवाहिका व ट्रक (क्र एम. एच. २६ ऐडी ७२७२) यांचा भीषण अपघात झाला. या आपघातात कलावती राघोजी डोरले (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर नांदेड येथे उपचारादरम्यान राघोजी मारोती डोरले (५१) यांचा आज पहाटे मृत्यू झाला. दोघे मृत पती-पत्नी होते.

अपघातात रूग्णवाहिका चालक अक्षय साळवे रा. वसई, तानाजी राघोजी डोरले (वय २६), नागोराव बळीराम डोरले (२२), गणेश संतोष शिंदे (वय १८), सचिन नामदेव डोरले (वय २४), सर्व रा राहुली बु., मुंजाजी आनंदराव मोधे (वय ३६), रा फुलधाबा ता औढा हे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन मोरे, तुकाराम आम्ले, संतोष पटवे, बालाजी जोगदंड, गजानन भोपे यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींना उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेद्वारे नांदेड येथे रवाना केले. पतीस नांदेड येथे उपचारासाठी नेतांना पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने राहुली बु.गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news