हिंगोली : पोळ्या लाटण्याच्या बहाण्याने नेऊन तीन महिलांना लुटले | पुढारी

हिंगोली : पोळ्या लाटण्याच्या बहाण्याने नेऊन तीन महिलांना लुटले

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : पोळ्या लाटण्याच्या बहाण्याने तीन महिलांना कारमधून नेऊन चाकूचा धाक दाखवत सुमारे १.३४ लाख रुपये किंमतीचे दागिने लुटल्याची घटना शनिवारी (दि.४) घोटा येथे घडली. याप्रकरणी नर्सी नामदेव पोलिसांनी एकाला आज (दि.५) अटक केली. नागोराव सुखदेव शिरामे (रा. हनकदरी, ता. सेनगाव) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटा येथील शांताबाई दत्तराव शेळके व इतर दोन महिला विविध कार्यक्रमात पोळ्या लाटण्याचे काम करतात. नागोराव शिरामे याच्यासोबत शांताबाई यांची ओळख झाली होती. मागील आठ दिवसांपासून नागोराव याने त्यांना सिध्देश्‍वर येथे एका कार्यक्रमात पोळ्या लाटण्यासाठी जायचे असल्याचे सांगितले होते. त्यासाठी इतर दोन महिलांनाही सोबत घेण्यास सांगितले. शनिवारी सकाळी नागोराव हा कार घेऊन घोटा येथे आला. त्याने शांताबाईसह दोन महिलांना सिध्देश्‍वर येथे जायचं असल्याचे सांगत लिंबाळा मक्ता मार्गे सिध्देश्‍वरकडे नेले. आडरानामध्ये त्याने चाकुचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिने ताब्यात घेतले. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास शांताबाई यांच्या मुलाला मारण्याची त्याने धमकी देली. त्यानंतर त्यांना लिंबाळामक्ता येथे आणून सोडले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी नागोराव याला अटक केली असून त्याच्याकडील मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा :

Back to top button