हिंगोली: शेतजमीन मोजण्यासाठी ५० हजारांची लाच मागणारा भूमापक 'एसीबी'च्या जाळ्यात | पुढारी

हिंगोली: शेतजमीन मोजण्यासाठी ५० हजारांची लाच मागणारा भूमापक 'एसीबी'च्या जाळ्यात

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : शेत जमीन मोजमापासाठी ५० हजारांची लाच स्वीकारताना भूमापकासह एकास अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (दि.३०) दुपारी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वसमत शहरातील उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयातील भूमापक मारूती घाटोळ यांनी शेत जमीन मोजमापासाठी शेतकर्‍याकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शेतकर्‍याने ‘एसीबी’कडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची खातरजमा केली.

भूमापक घाटोळ याने आज दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान बसस्थानक परिसरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारा चंदू भेदेवाड याच्याकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितले. तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती चंदू भेदेवाड आणि भूमापक मारोती घाटोळस लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे

हेही वाचा : 

Back to top button