हिंगोली : गोळेगाव येथील पुल तुटल्याने विद्यार्थ्यांचे हाल; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष? | पुढारी

हिंगोली : गोळेगाव येथील पुल तुटल्याने विद्यार्थ्यांचे हाल; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष?

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणामधून निघालेला कालवा औंढा तालुक्यातून गोळेगाव, कोनसी अशा खेड्यांना पार करत पुढे जातो. अनेक खेड्यांना जोडणारे छोटे-मोठे पूल या कालव्यावर बांधले गेले आहेत. याच दरम्यान गोळेगाव येथील पुल तुटल्याने पुलावरून जाणारे पादचारी आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

सिद्धेश्वर धरणावरील खेड्यात १९६२ ते १९६८ च्या दरम्यान अनेक पुल बांधले गेले. अनेक ठिकाणचे पुल हे तुटले आहेत. तर अनेक ठिकाणी पुलांच्या नुसत्या खुणाच दिसून येत आहे. पूर्ण कालव्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ-मोठे भगदाड पडली आहेत. अनेक लोकांनी या कालव्यांना खोदून व भगदाडे पाडून आपल्या पाण्याच्या गरजा पूर्ण केलेले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

याच दरम्यान गोळेगाव येथील मुख्य रस्त्यावर असलेला पूल तुटल्यामुळे गोळेगाव येथील रहिवाशांचे व विद्यार्थी वर्गाला खूपच त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून हा फुल तुटला असल्याने पाटबंधारे विभागाकडून मात्र, दुर्लक्ष केले जात आहे. या पुलामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष द्‍यावे अशी मागणी  पालक वर्गातून होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button