हिंगोली : पॉलिटेक्निकच्या प्राचार्यावर विनयभंगाचा गुन्हा | पुढारी

हिंगोली : पॉलिटेक्निकच्या प्राचार्यावर विनयभंगाचा गुन्हा

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली येथील पॉलिटेक्नीक महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेने हिंगोली पोलिसांत प्राचार्याविरोधात विनयभंगाची तक्रार दिली. या तक्रारीनंतर प्राचार्यावर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. २८) दुपारी गुन्हा दाखल झाला. डॉ. अशोककुमार उपाध्याय असे प्राचार्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हिंगोलीच्या पॉलिटेक्नीक महाविद्यालयात मागील काही दिवसांपासून वादाला तोंड फुटले आहे. प्राचार्य डॉ. उपाध्याय यांच्याकडून महिला प्राध्यापकांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. प्राध्यापिकांना अर्वाच्य भाषेत बोलणे, त्यांना महाविद्यालयाच्या वेळेनंतर कार्यालयात बोलावून वेठीस धरण्याचे प्रकार सुरु होते. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे देखील या महिला प्राध्यापिकेने तक्रार दिली आहे.

या प्रकरणात शनिवारी दुपारी एका प्राध्यापिकेने हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय हे त्यांच्या पदाचा गैरवापर करून कार्यालयीन वेळेनंतर बोलावून विकृत भाषेत बोलतात तसेच अर्वाच्य भाषेत बोलून अपमानीत करतात. शिवाय स्वच्छतागृहाच्या परिसरात सतत चकरा मारून विनयभंग करीत असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. तसेच प्राध्यापिका व इतरांना वेठीस धरून पदाचा गैरवापर करून धमकावल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. यावरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी प्राचार्य अशोककुमार उपाध्याय याच्या विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक आर. एन. मळघणे, उपनिरीक्षक एस. एम. मुपडे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, पॉलिटेक्नीक महाविद्यालायातील प्राचार्यांवर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे.

हेही वाचा

Back to top button