परभणी : कापूस, सोयाबीनला भाव देण्याची मागणीसाठी शेतक-यांचा सोमवारी एल्गार मोर्चा

मानवत (परभणी) , पुढारी वृत्तसेवा : कापूस व सोयाबीनला बाजारात भाव वाढून द्यावा यासह अन्य मागण्यासाठी सोमवारी ( दि.२३) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील नगरपालिकेपासून दुपारी १२:३० वाजता मोर्चास सुरुवात होणार आहे. हा मोर्चा मुख्य मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढला जाणार आहे. या मोर्चात शेतकर्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, महिला प्रदेशाध्यक्ष रसिकाताई ढगे यांनी केले आहे.
हेही वाचा :