हिंगोली : औंढा नागनाथ मंदिरात मास्क वापरणे बंधनकारक | पुढारी

हिंगोली : औंढा नागनाथ मंदिरात मास्क वापरणे बंधनकारक

औंढा नागनाथ (हिंगोली), पुढारी वृत्‍तसेवा : आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागेश्वर नागनाथ मंदिरामध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता पुरोहित पुजारी सर्व संस्थान कर्मचारी तसेच सर्व भाविकांसाठी मंदिर परिसरात प्रवेश करताना मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.

संस्थानाध्यक्ष यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तहसीलदार तथा नागनाथ संस्थानाध्यक्ष डॉ. कृष्णा कानगुडे यांनी याबाबत सूचना दिल्‍या आहेत. तर मंदिरामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये पाच फुटाचे अंतर राखणे, मास्‍क वापरणे, बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाचा महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता हे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

.हेही वाचा 

जळगाव जिल्हा बँकेच्या संचालिका जनाबाई महाजन अपात्र ; खडसे गटाला धक्का

China Corona Update : चीनमध्ये एका दिवसात ३ कोटी ७० लाख लोकांना कोरोनाची लागण

 शिवनगर : ऊस वाहतूकदारांची फसवणूक थांबवावी : योगेश जगताप यांचे प्रतिपादन

Back to top button