परभणी : कॉलेज तरुण सुखरूप आला घरी; अपहरण झाल्‍याची अफवा | पुढारी

परभणी : कॉलेज तरुण सुखरूप आला घरी; अपहरण झाल्‍याची अफवा

मानवत, (परभणी), पुढारी वृत्तसेवा : नारायणनगर भागातील बेपत्ता झालेला १७ वर्षीय कॉलेज तरुण बुधवारी (दि.20) दुपारी ४ च्या सुमारास सुखरूप घरी परत आला. अभ्यासाचा ताण व अँड्रॉइड मोबाईल वापरास न दिल्यामुळे तो पुणे येथे गेला असल्याचे समजते.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, शहरातील नारायणनगर भागातील तरुण अथर्व रंगनाथ कोंडगिर (वय १७) हा युवक शहरातील केकेएम महाविद्यालयात इयत्ता १२ वीमध्ये शिकत आहे. तो मंगळवारी सकाळी ९ वाजता कॉलेजला जातो म्हणून घरून गेला होता. परंतु तो घरी आलाच नाही. नातेवाईकांनी कॉलेजमध्ये चौकशी केली असता तो कॉलेजला आला नसल्याचे समजले. या प्रकरणी मित्रांकडे व इतरत्र चौकशी करूनही तो न सापडल्याने अथर्वचे वडील रंगनाथ कोंडगिर यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोबाईलमुळे रुसला 

अथर्व कोंडगिर यास घरच्यांनी अँड्रॉइड मोबाइल ऐवजी साधा मोबाईल दिल्याने नाराज झाल्याने आणि अभ्यासाच्या ताण असल्‍याने तो रेल्वेने पुणे येथे गेल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांनी दै. पुढारीशी बोलताना याबाबत माहिती दिली.

.हेही वाचा  

दहा वर्ष पूर्ण झालेल्या आधारकार्डची कागदपत्रे अद्यावत करावीत : जिल्हाधिकारी जलज शर्मा

परभणी : जिंतूर तहसीलमधील ‘फोटो मार्फिंग’ प्रकरणी चौकशी समिती नेमणार : देवेंद्र फडणवीस

पिंपरी: शहरातील रस्त्यावर कचर्‍याचे ढीग, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

Back to top button