बीड : होमपीचवर पुतण्या ठरला काकाला भारी; राजुरी ग्रामपंचायत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात | पुढारी

बीड : होमपीचवर पुतण्या ठरला काकाला भारी; राजुरी ग्रामपंचायत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात

बीड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मोठी आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व आ. संदीप क्षीरसागर यांचे होमपीच असलेल्या राजुरी ग्रामपंचायतीत काका- पुतण्याने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. येथील निकाल घोषित झाले असून, सरपंच पदासह सर्व १३ सदस्य हे राष्ट्रवादीचे विजयी झाले आहेत. हे सर्व उमेदवार आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटाचे आहेत.

पुतण्या संदीप क्षीरसागर याने आपल्या गावातील निवडणुकीत काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मोठा धक्का दिला आहे. राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. काका पुतणे विभक्त झाल्यानंतर राजुरीत परिवर्तन होईल असे वाटत होते. परंतु पुन्हा एकदा राजुरीचा गड राखण्यात राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटाला यश मिळाले आहे.

हेही वाचा:

Back to top button