बीड तालुक्यात ८६ टक्के मतदान | पुढारी

बीड तालुक्यात ८६ टक्के मतदान

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ७५ सरपंच व ६५१ सदस्यासाठी रविवार रोजी सकाळ ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत २५७ मतदान केंद्रावर अत्यंत शांततेत व मोठ्या पोलीस बंदोबस्तात पार पडले. तर तालुक्यातील काही ठिकाणी सकाळी मतदान सुरू झाले, नंतर मतदान यंत्रे अर्धा तास बंद पडले होते. यामुळे मतदान अधिकारी व कर्मचारी व मतदारांमध्ये चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सायंकाळपर्यंत तालुक्यात ८६ % मतदान झाले.

तालुक्यातील ७५ सरपंच पदासाठी २४० उमेदवार तर ६५१ सदस्यासाठी १५५१ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. रविवार (दि.१८) रोजी तालुक्यातील २५७ मतदान केंद्रवर सकाळी ७.३०ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ होती. या वेळेत तालुक्यात ८६ टक्के मतदान शांततेत व मोठ्या पोलीस बंदोबस्तात पार पडले.

तालुक्यातील अर्धमसला येतील तीन मतदान केंद्रावरील तसेच सिरसदेवी, गुळज भोगलगाव, म्हाडुळा या ठिकाणी मत‌दान यंत्रे अर्धा तास बंद पडल्याने चांगलीच धांदल उडाली होती. नंतर नवीन मतदान यंत्रे बसवुन तसेच बंद पडलेले यंत्र दुरूस्त करून मतदान पार पडले. मंगळवार रोजी मतमोजणी प्रक्रिया पंचायत समिती कार्यालयात येथे पार पडणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली

तहसीलदारांची गावोगावी भेट

सकाळ पासूनच बंदोबस्तात मचदानाला सुरुवात झाली. पहाटे सहा वाजल्यापासून तहसीलदार सचिन खाडे यांनी अनेक गावाला भेटी देत मतदाराला मतदान करण्यासाठी जागरूक केले. तर अतिसंवेदनशील गावी जावून भेटी देत मतदान शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा;

Back to top button