पुणे : नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट कपड्यांची चोरून विक्री | पुढारी

पुणे : नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट कपड्यांची चोरून विक्री

पुणे; पुढारी वृत्तसेवा :  लष्कर परिसरातील फॅशन स्ट्रीटमध्ये नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट कपड्यांची चोरून विक्री करणार्‍या पाच जणांना पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या युनिट-2 ने फॅशन स्ट्रीटमध्ये छापा टाकून पावणेतीन लाख रुपये किमती मुद्देमाल जप्त केला.

निसरुद्दीन शमशुद्दीन शेख (वय 31, रा. कोंढवा), रिझवान इरशद कुरेशी (वय 32, रा. लष्कर), नोमान नजीर शेख (वय 29, रा. नाना पेठ), सय्यद राफे मक्बूल अख्तर (वय 32, रा. भवानी पेठ) आणि मुस्ताक हसन कुरेशी (वय 30, रा. लष्कर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. आरएनए टेक्नॉलॉजीचे अधिकारी महेंद्र देवरा यांनी फिर्याद दिली.

या विक्रेत्यांकडून दोन लाख 80 हजार रुपयांचे नामांकित कंपन्यांचे बनावट कपडे जप्त करण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट-2 चे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विशाल मोहिते, पोलिस अंमलदार गजानन सोनुने, उज्ज्वल मोकाशी, नागनाथ राख, मोहसीन शेख, निखिल जाधव, साधना ताम्हाणे या पथकाने केली.

 

Back to top button