

जवळा बाजार; पुढारी वृत्तसेवा : बाजार समितीचे माजी सभापती अंकुशराव आहेर यांनी अखेर कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. वसमत विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनखुळे यांच्या हिंगोली दौऱ्यावेळी आहेर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे अंकुशराव आहेर हे दोन वर्षांपासून पक्षांतर करणार असल्याची चर्चा सुरू होती. पण पक्षातील वरिष्ठ मंडळींनी पक्षांतर करू नका, असा सल्ला त्यांना दिला होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आहेर यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते द्वीधावस्थेत होते. दीपावलीच्या मुहूर्तावर आहेर भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी पुन्हा चर्चा सुरू होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सोमवारी हिंगोली जिल्ह्यात दौरा होता. या दौऱ्यावेळी आहेर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
हेही वाचा :