Beed Crime : नवऱ्याने बायकोच्या नाकाला चावा घेऊन लचका तोडला | पुढारी

Beed Crime : नवऱ्याने बायकोच्या नाकाला चावा घेऊन लचका तोडला

केज; गौतम बचुटे : अनेक वेळा कुत्रा माणसाला चावल्याचे ऐकायला मिळते. पण केज मध्ये याच घटनेला अनुसरुन एक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याने बायकोच्या नाकाचा चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत पीडित महिला गंभीर जखमी झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की (दि. ११) उत्तरेश्वर पिंप्री येथे पूनम शिंदे आणि अशोक शिंदे दाम्पत्यामध्ये भांडण झाले. या भांडणात चारित्र्यावर संशय घेऊन नवऱ्याने पीडित महिलेला मारहाण केली. तसेच सासू सुनिता शिंदे आणि सासरा उद्धव शिंदे यांनी देखील केस धरुन मारहाण करीत शिवीगाळ केली. या तिघांनी मिळून केलेल्या मारहाणीच्या झटापटीत तिचा नवरा अशोक शिंदे याने पीडित महिलेच्या नाकाचा चावा घेतला. यात ती गंभीर जखमी झाली.

या प्रकरणी पूनम शिंदे या पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून (दि. १२) केज पोलीस ठाण्यात तिचा नवरा अशोक उद्धव शिंदे, सासरा उद्धव माणिक शिंदे आणि सुनिता उद्धव शिंदे या तिघांच्या विरुद्ध गुं. र. नं. ५७१/२०२२ भा. दं. वि. ३२३, ३२४, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजू गुंजाळ हे तपास करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button