कोपरगाव : जिल्हयात १५ साखर कारखान्यांकडून २९ लाख ४६ हजार मे. टन उसाचे गाळप | पुढारी

कोपरगाव : जिल्हयात १५ साखर कारखान्यांकडून २९ लाख ४६ हजार मे. टन उसाचे गाळप

कोपरगाव : प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हयातील १५ साखर कारखान्यांनी ७ डिसेंबर पर्यंत २९ लाख ४६ हजार ९३८ मे टन उसाचे गाळप करून त्यापासून २५ लाख ३ हजार ३७५ साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे तर दैनंदिन साखर उतारा १०.४५ असा आहे.
जिल्हयातील साखर कारखान्यांचे गाळप मे टनात, साखर पोते व दैनंदिन साखर उतारा पुढीलप्रमाणे.

अंबालिका (४ लाख ९४ हजार ५९० मे.टन) (४ लाख ६६ हजार ५५० साखर पोते). (१०.६७ साखर उतारा), मुळा (३१२०००) (२०८५५०), (१०.१३), थोरात (२९०२९०) (२७८७३०), (११.७०), ज्ञानेश्वर (२९९८७०) (२५४७००) (११.०३), सहकारमहर्षि नागवडे श्रीगोंदा (२२१११०) (१९१५५०), (९.४२), पदमश्री विखे पाटील (२२८२५००) (१६६७००), (११.००), कुकडी (१६९४००) (१५०८५०), (९.९०), अशोक (१५७६२०) (१४२९५०) (११.५३), सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (१५००६१) (१२४४००) वृध्देश्वर (१२२६१०) (१०८५००), अगस्ती (११५५२९) (११२६२०), (१०.४०), केदारेश्वर (१०३१९०) (८०५५०). (९.७५), कर्मवीर शंकरराव काळे (८४८०८) (७९९००), (१०.२१), मुळा (३१२०००)(२०८५५०) (१०.१३), गंगामाई (१८३३१०) (१२७४५०) (१०.८०), गणेश (१४३००)(९३७५) (९.५१)याप्रमाणे गळीत झाले आहे.

पुढील हंगामात देखील शेतकऱ्यांनी ज्यादा उसाचे उत्पादन देणाऱ्या ऊसाच्या जाती अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड केल्या आहेत. भुसार पिकाचे क्षेत्र कमी होत आहे. मागील वर्षी कांदा उत्पादन होऊन तो चाळीमध्येच सडल्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडेही दुर्लक्ष केले आहे. २६५ जातीच्या ऊस वाणाला बहुतांश साखर कारखान्यांनी गाळपासाठी नकाराची घंटा दर्शवली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये साखर कारखान्यांच्या या दुजाभावाच्या वागणुकीबद्दल चलबीचल सुरू आहे. काही कारखाने मात्र हा ऊस तोडून नेत आहे. या उसातून शेतकऱ्यांना जादा उसाचे वजन मिळत असल्याने शेतकऱ्यांची पसंती याच लागवडीकडे आहे, तर कारखाने मात्र ज्यादा उतारा मिळणाऱ्या उसासाठी आग्रही असतात, त्यामुळे कारखान्याच्या शेतकी विभागाचे कर्मचारी आणि सभासद शेतकऱ्यांमध्ये तोडीबद्दल खटके उडू लागले आहे., परिणामी दैनंदिन कारखान्याशी असणारा संपर्क तुटू लागला आहे.

Back to top button