परभणी : सोनूळा ग्रामपंचायत बिनविरोध, ७ ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती | पुढारी

परभणी : सोनूळा ग्रामपंचायत बिनविरोध, ७ ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती

मानवत; पुढारी वृत्तसेवा : मानवत तालुक्यातील मुदत संपलेल्या ८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता. ७) सरपंचपदाच्या ८ जागांसाठी २७ तर ६६ सदस्यांसाठी १३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मौजे सोनूळा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व ७ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. येथे भाजप पुरस्कृत स्वराज्य ग्रामविकास पॅनलने बाजी मारली. तर वझुर बु या ग्रामपंचायतीचा १ सदस्य बिनविरोध झाला आहे.

तालुक्यातील इरळद, देवळगाव आवचार, वझुर बु, सोनूळा, कोल्हावाडी, रत्नापूर, आंबेगाव व मानोली या ८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. बुधवारी (ता.७) अर्ज छाननी व उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर एकूण ८ ग्रामपंचायतींमध्ये ८ सरपंच पदासाठी २७ तर ५९ सदस्यपदासाठी एकूण १३४ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत, अशी माहिती तहसीलदार प्रतीक्षा भुते व नायब तहसीलदार नकुल वाघुंडे यांनी दिली.

सोनूळा ग्रामपंचायत बिनविरोध

मौजे सोनूळा ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणूक झाली आहे. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत स्वराज्य ग्रामविकास पॅनलने बाजी मारली. बिनविरोध उमेदवार : संताबाई शाम गिरी (सरपंच), श्रीराम त्रिंबक कदम, आशामती विलास सोनटक्के, सुमन विठ्ठल भोरकडे, कविता विठ्ठल भोरकडे, अमोल हनुमान भोरकडे, सुनिता श्रीरंग भोरकडे व सुभाष दत्तराव पाष्टे हे विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांना भाजपचे माजी आमदार मोहन फड, ओबीसी मोर्चाचे राज्य सरचिटणीस अनंत गोलाईत, भाजपचे नेते बाळासाहेब जाधव, दादा भोरकडे, स्वराज्य संघटनेचे निमंत्रक मंगेश भरकड यांनी अभिनंदन केले. तसेच वझूर बु येथील प्रभाग क्रमांक एकमध्ये सदस्य पदासाठी सर्वसाधारण स्त्री गटातील महिला बिनविरोध निवडून आली आहे.

हेही वाचा :

Back to top button