धर्माबाद येथे १७ तंबाखू विक्रेत्यांवर १८ हजारांची कारवाई

धर्माबाद, पुढारी वृत्तसेवा : तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळताच जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने धर्माबाद शहरात अचानक धाड टाकून १७ तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई केली. या कार्यवाहीत तंबाखू विक्रेत्यांना १८ हजार ३०० रुपयांचा दंड आकारला. शुक्रवारी (दि.२) पथकाने ही कार्यवाही सुरू केल्याने एकच धांदल उडाली होती.
सदरील कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, तसेच ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथील वैद्यकीय अधीक्षक वेणुगोपाल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन आडे व स्थानिक पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.जयराम चुकेवाड व पी.सी. एस.आर.घोसले आदीजण पथकात होते.
सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास तक्रार नोंदवा. जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
हेही वाचलंत का?
- Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने राशिद खान, पोलार्डच्या खांद्यावर सोपावली नवी जबाबदारी
- Romelu Lukaku : लुकाकूकडून डगआउटची तोडफोड; विश्वचषकातून बाहेर पडल्याने अश्रूअनावर
- Gram Panchayat Election | जळगाव जिल्ह्यात अटवाडे ग्रा. पं. निवडणुकीत सरपंच पदासह सर्व जागा बिनविरोध