Parbhani : भाजपच्या परभणी लोकसभा प्रभारीपदी भागवत कराड, जिल्हा संयोजकपदी सुभाष कदम | पुढारी

Parbhani : भाजपच्या परभणी लोकसभा प्रभारीपदी भागवत कराड, जिल्हा संयोजकपदी सुभाष कदम

परभणी; पुढारी वृत्तसेवा :  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परभणी लोकसभा प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री भागवत कराड, तर संयोजक म्हणून सुभाष कदम यांची निवड केली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात गाव-वस्ती, वाडी-तांड्यावर पक्ष वाढीसाठी हे निर्णय घेण्यात आले आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात भाजपचे संघटन बुथ कार्यकारणी बांधणी सक्षमरित्या होण्यावर भर दिला जात आहे. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत पक्षाला यश मिळविण्यासाठी भागवत कराड आणि सुभाष कदम यांच्या निवड करण्यात आल्या आहेत.

कदम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून १२ वर्षे त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. भाजपमधून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा चळवळ उभारली. जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी सतत धडपड करत असल्याने कदम यांच्या खांद्यावर लोकसभा संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा

Back to top button