Beed Election : केज तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी तीन दिवसात एकूण ३५१ अर्ज दाखल | पुढारी

Beed Election : केज तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी तीन दिवसात एकूण ३५१ अर्ज दाखल

केज; पुढारी वृत्‍तसेवा : केज तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण २२८ उमेदवारी नामनिर्देशन अर्ज दाखल झाले. त्या पैकी ३७ सरपंच पदासाठी तर १९१ सदस्य पदासाठी अर्ज दाखल आहेत.

केज तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत अर्ज दाखल करण्याच्या तीसऱ्या दिवशी सरपंच पदासाठी ३७ तर सदस्य पदासाठी १९१ अर्ज दाखल झाले आहेत. असे एकूण २२८ अर्ज दाखल झाले आहेत.

तीन दिवसात सरपंच पदासाठी एकूण ७२ तर सदस्य पदासाठी २७९ असे एकूण ३५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच अद्याप पर्यंत एकही नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले नसलेल्या २५ ग्रामपंचायती आहेत. अशी माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक प्राधिकृत अधिकारी लक्ष्मण धस यांनी दिली आहे.

हेही वाचा

Back to top button