अमरावती : वाहतूक नियम तोडणाऱ्यांना अडीच कोटी दंडाच्या नोटिसा

अमरावती : वाहतूक नियम तोडणाऱ्यांना अडीच कोटी दंडाच्या नोटिसा
Published on
Updated on

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अमरावती येथे वाहतूक नियमांची पायमल्ली करणा-यांविरूद्ध पोलीसांनी राबविलेल्या मोहिमेत जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत १२ हजार १२८ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे २ कोटी ४३ लाख २७ हजार ५०० रूपये दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी दिली. दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रभावी जनजागृतीसाठी ग्रामीण पोलीसांनी अनोखा उपक्रम राबवला. यमराजाच्या वेशभूषेतील कलावंतांनी रस्त्यांवर वाहतूक नियमांबाबत प्रबोधन केले.

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ तिवसा-अमरावती-लोणी, मोर्शी-वरूड-पांढुर्णा, मोर्शी-चांदूर बाजार-परतवाडा, दर्यापूर-खोलापूर- येवदा, आसेगाव-परतवाडा, दर्यापूर-अंजनगाव-परतवाडा, राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ नागपूर-औरंगाबाद, अमरावती-नांदगाव खंडेश्वर-यवतमाळ, परतवाडा-धारणी-खांडवा, अमरावती-चांदूर रेल्वे-धामणगाव-देवगाव या मार्गांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुूरू असते. त्यामुळे या मार्गांवर अपघाताच्या संख्येतही वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील अपघात रोखण्यासाठी वेगमर्यादा न पाळणा-या वाहनधारकांवर कारवाईसाठी जिल्हा वाहतूक शाखेने इंटरसेप्टर वाहनांसह पथके तैनात केली असल्याचे बारगळ यांनी सांगितले.

पोलिसांकडून बहुरूपी कलावंताची मदत घेऊन जनजागृती उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यमराजाच्या वेशभूषेतील कलावंतांकडून महत्वाचे रस्ते, वर्दळीचे चौक, बाजारपेठा, शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. अपघात टाळण्यासाठी हेल्मेट व सीटबेल्टच्या वापराबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. ग्रामीण पोलीसांच्या विशेष मोहिमेत जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, पोलीस अंमलदार दिलीप नांदूरकर, नीलेश तायडे, नीलेश राऊत, सुजीत वानखडे सहभागी झाले होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news