हिगोंली : राज्यपालांनी पदाचा राजीनामा द्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने निषेध | पुढारी

हिगोंली : राज्यपालांनी पदाचा राजीनामा द्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने निषेध

हिगोंली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल आज औंढा नागनाथ येथे महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. ‘राज्यपालांनी पदाचा राजीनामा द्यावा’ याबाबतचे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अपशब्द वापरला होता. याचे पडसाद आता हिंगोलीतील औंढा नागनाथ येथे उमटले असून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात ‘शिवाजी महाराजांची तुलना एखाद्या व्यक्तीसोबत करणे हे महाराजांना मानणारा विचार पुसून टाकण्यासारखे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माचे आदर्श राजे होते. राज्यपालांनी अशा थोर व्यक्तीबद्दल असे वक्तव्य करणे म्हणजे, देशाची अब्रू वेशीवर टाकण्यासारखे आहे.’

‘सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वक्तव्य करून महाराष्ट्रातील स्त्रियांचा लोकांचा अपमान केला. राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. सुभाष चंद्र बोस, महापुरुष कोणत्याही एका जाती धर्मात पुरते नव्हते. हे महापुरुष संबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. यांचा अवमान करणे हा गुन्हा आहे. महाराष्ट्र ही साधू- संतांची भूमी असलेले राष्ट्र आहे. राष्ट्रपुरुषांचा अवमान केल्याबद्दल आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे निवेदन औंढा नागनाथ तहसीलदार यांना महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रपतींना यांना देण्यात आले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मूनीर पटेल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जि. डी. मुळे. राष्ट्रवादी काँग्रेसचे रघुनाथ हांडे, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली झटे, काँग्रेसचे बाळासाहेब देशमुख, आदीत्य आहेर, आलीम खतीब, विलास जवादे, नागनाथ देशमुख, सुधीर राठोड, सुमेध मुळे, गणेश देशमुख, आज्जू ईनामदार, प्रवीण टोम्पे, पंकज जाधव, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करून निवेदन दिले.

हेही वाचलंत का? 

Back to top button