Beed : ४६ वर्षीय नराधमाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार | पुढारी

Beed : ४६ वर्षीय नराधमाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

धारूर; पुढारी वृत्तसेवा : धारूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर ४६ वर्षाच्या नराधमाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. अर्जुन मारुती बडे असे आरोपीचे नाव आहे. अत्याचार करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे देखील सांगितले जात आहे. पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीवर धारूर पोलिसात बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि.१२) धारूर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. दुपारी बारा ते एकच्या दरम्यान पिडित अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार केले. या अत्याचारानंतर कोणाला ही माहिती दिली तर जीवे मारुन टाकण्याची धमकी धमकी दिली

ऊस तोडणीसाठी गेलेल्या आपल्या आई-वडिलांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर घटनेच्या दुसऱ्या दिवशी मुलीचे आई वडील यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यानंतर नराधम अर्जुन बडे याच्या विरोधात धारुर पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर आरोपींविरोधात 376 ,504,506,34 पोक्सो 4,8,12,324 या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी एस आय घोडे करत आहेत.

हेही वाचा

Back to top button