

वडगाव शेरी; पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर-लोहगाव येथील अनधिकृत हॉटेलवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने शनिवारी कारवाई केली. लोहगाव परिसरातील सर्वे. नं. 234 मधील 7750 चौरस फुटांची अतिक्रमणे या कारवाईत काढण्यात आली.
तसेच कल्याणीनगर चार हॉटेल व्यावसायिकांनी केलेली बेकायदा 5750 चौरस फुटांचे रुफ टॉपचे अतिक्रमण पाडण्यात आले. एक जेसीबी, ब—ेकर, गॅस कटर व दहा बिगारींच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. या वेळी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात होता. अभियंता रोहिदास गव्हाणे, यांच्या तीन उपअभियंता यांनी ही कारवाई केली.