औरंगाबाद 'स्मार्ट सिटी'त नोकर भरती : १ नोव्हेंबर रोजी थेट मुलाखती

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने सिटी बस विभागासाठी कंत्राटी तत्वावर नोकर भरती करण्यात येत आहे. यामध्ये क्लर्क, मेकॅनिक, इस्टॅब्लीशमेंट सुपरवायझर आणि असिस्टंट मॅनेजर या संवर्गातील ३१ पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती होणार आहेत.
औरंगाबाद स्मार्ट सिटीच्यावतीने सिटी बससेवा सुरू करण्यात आलेली आहे. या सिटी बस सेवेसाठी ऑफिस स्टाफ भरण्यात येणार आहे. सिटी बससाठी चालक आणि वाहक खासगी एजन्सीच्या माध्यमातून आऊटसोर्सींग पद्धतीने घेण्यात आलेले आहेत. ऑॅफिस स्टाफ हा थेट स्मार्ट सिटीच्यावतीने भरती केला जाणार आहे. ही भरती कंत्राटी तत्वावर असणार आहे. त्यासाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जाहिरातीनुसार, स्मार्ट सिटीत एक असिस्टंट मॅनेजर (ऑपरेशन), २ टेक्निकल सुपरवायझर, १ इस्टॅब्लीशमेंट सुपरवायझर, ९ क्लार्क आणि १८ मेकॅनिकलची पदे भरले जाणार आहेत. या सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी असणार आहे. क्लर्क, इस्टॅब्लीशमेंट सुपरवायझर आणि असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी १ नोव्हेंबर रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तर मेकॅनिक पदासाठी ४ नोव्हेंबर रोजी मुलाखती होतील. आमखास मैदानाजवळील स्मार्ट सिटी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत या मुलाखती होणार आहेत. इच्छूक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह थेट मुलाखतीस हजर राहावे, असे स्मार्ट सिटीच्यावतीने कळविण्यात आले आहे.
हेही वाचा :
- शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा विद्यार्थी ताब्यात
- सातारा : मुलाकडून वडिलांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून संपत्ती हडपण्याचा प्रयत्न