लोकहिताचे कामे केली तर आदर्श गावे निर्माण होतील : भास्कराव पेरे पाटील | पुढारी

लोकहिताचे कामे केली तर आदर्श गावे निर्माण होतील : भास्कराव पेरे पाटील

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : गावाच्या लोकप्रतिनिधीने लोकहिताची कामे केली तर आदर्श गाव निर्माण होतील, असे प्रतिपादन भास्करराव पेरे पाटील यांनी केले. ते आम्ही रांजाळेकर विकास फाउंडेशन,आयोजित बळीराजा महोत्सव २०२२ या कार्यक्रमात बोलत होते. पेरे पाटील म्हणाले की, शिक्षण, आरोग्य, वृक्ष लागवड, नागरी सुविधा या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. गावाचा ग्रामसेवक, सरपंच हा गावाचा मायबाप, विठ्ठल आहे. प्रत्येक नागरीकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम करुन शासनाच्या विविध योजनांत सहभाग घेऊन शासनाचे विविध पुरस्कार गावांनी प्राप्त केले पाहिजेत, गावकीतील भाव-भावकीतील वाद टाळले पाहिजेत. गावासाठी काही तरी समाज उपयोगी काम करून योगदान द्यावे.

या कार्यक्रमाला रांजाळा पंचक्रोशीतील अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य पंचक्रोशीतील अनेक राजकीय क्षेत्रातील आजी-माजी पदाधिकारी ,सामाजीक कार्यकर्ते ,अधिकारी कर्मचारी, नागरीक उपस्थित होते. याप्रसंगी सायन्स वॉलची फित कापून त्याचे लोकाअर्पण करण्यात आले. यावेळी सत्कारमुर्ती डॉ. रामेश्वर नाईक, यांनी मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक वैदय यांनी केले.

हेही वाचलंत का?

 

 

Back to top button