पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणच्या 'झोम्बी' अँजेलिना जोली हिची तुरूंगातून सुटका करण्यात आली आहे. सहर तबर या नावाने वावरणाऱ्या या इराणी तरूणीचे खरे नाव फतेमेह खिशवंद आहे. हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीचे भीतीदायक फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत होती. या फोटोंमुळे तिला इंस्टाग्रामवर खूप प्रसिद्धी मिळाली. तुरुंगातून सुटल्यानंतर आता तिने आपला खरा चेहरा सर्वांना दाखविला आहे. (Zombie Angelina Jolie)
सहर तबरला ऑक्टोबर २०१९ मध्ये भ्रष्टाचार आणि ईशनिंदा या तेथील स्थानिक आरोपाखाली अटक करण्यात आली होती. १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा तिला सुनावण्यात आली होती. महसा अमिनी या महिलेच्या मृत्यूनंतर देशव्यापी चालू असलेल्या हिजाब निषेधाच्या पार्श्वभूमीवर सहर तबरची सुटका करण्यात आली आहे. 14 महिन्यांनंतर तिची ही सुटका करण्यात आली. अँजेलिना जोलीसारखे दिसण्यासाठी सहर तबरने तिच्या चेहऱ्यावर कॉस्मेटिक सर्जरी केल्याचा दावा देखील केला जात आहे. (Zombie Angelina Jolie)
महसा अमिनी हिचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. जेव्हा तिला अटक करण्यात आली तेव्हा सहर फक्त 19 वर्षांची होती. येथील प्रसारमाध्यमांच्या माहितीनूसार फक्त एका विनोदामुळे सहर हिला तुरुंगात जावे लागले होते. आपली मुलगी निर्दोष असल्याचे सांगत तीची आई रोज रडत असते. तीची तुरुंगातून सुटका झाली पाहिजे यासाठी येथील स्थानिक लोकांनी प्रयत्न केले. खऱ्या अँजेलिना जोलीकडेही यासाठी मदत मागण्यात आली होती.
तुरुंगातून सुटल्यानंतर, तबरने दिलेल्या मुलाखतीमधील माहितीनूसार, तीने काही कॉस्मेटिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. जसे की नोज जॉब (Nose Job), लिप फिलर (lip filler) आणि लिपोसक्शन (Liposuction). तसेच ती असे देखील म्हणाली की, तीने पोस्ट केलेल्या फोटो इतकी ती प्रत्यक्षात तेवढी भितीदायक दिसत नव्हती. इंस्टाग्रामवर असलेली सर्व छायाचित्रे फोटोशॉप आणि मेकअपच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहेत. तिच्या भितीदायक फोटोंमुळे तिला सोशल मीडियावर 'झॉम्बी अँजेलिना जोली' असे म्हटले जाऊ लागले.
सहर तबर हिचा सध्याचा फोटो
सहर तबर म्हणजेच 'झोम्बी अँजेलिना जोली' हीचे इन्स्टाग्राम अकाऊंट
हेही वाचा