

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. तसेच शेतातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. रडकुंडीला आलेल्या शेतकर्यांना प्रशासनाच्या दरबारातून अद्याप कुठलीच मदत मिळत नाही. शेतकरी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करत आहेत.
आयुक्त सुनील केंद्रेकर हे शेतातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. औरंगाबादहून येताना त्यांनी गेवराईत येथील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी रस्त्यावरून जाताना अचानक एका ठिकाणी गाडी थांबविली आणि थेट ते कापसाच्या पिकात दाखल झाले. उरलासुरला कापूस वेचताना उपस्थित शेतकर्यांनी केंद्रेकरांना पाहताच व्यथा मांडायला सुरुवात केली.
केंद्रेकर चिखल असलेल्या शेतात शेतकर्यापर्यंत गेले. त्याच्यासोबत चर्चा करत आणि पिकांची पाहणी करत नुकसान मोठे असल्याचे सांगितले. बीड, आष्टी, पाटोदा या भागात पाहणी करणार आहोत, असेही केंद्रेकरांनी या वेळी म्हटले. नुकसान झाल्याचे सांगण्याची गरज नाही, ते समोर दिसूनच येत आहे. आपणाला मदत मिळेल, वस्तूस्थितीनुसारचा अहवाल सरकार दरबारी पाठवला जाईल. एकदा पाहणी झाल्यानंतर बीड जिल्हा प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या जाणार असल्याचे केंद्रेकर यांनी शेतकर्यांना आश्वासन दिले.
हेही वाचा