बीड : गेवराई तालुक्यात १ लाख २ हजार हेक्टर क्षेत्र बाधीत | पुढारी

बीड : गेवराई तालुक्यात १ लाख २ हजार हेक्टर क्षेत्र बाधीत

गेवराई (बीड), पुढारी वृत्तसेवा : परतीच्या पावसाने गेवराई तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यात एकूण क्षेत्र 1 लाख 8 हजार 369 हेक्टरवर पेरणी झालेली आहे. यातील तब्बल 1 लाख 2 हजार हेक्टरवर क्षेत्र बाधीत झाले आहे. अजूनही पाऊस सुरूच असून त्यामुळे आणखी शेतकर्‍यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मंडळाधिकारी आणि तलाठ्यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जावून नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ अहवाल द्यावा, अशा सूचना गेवराई प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

परतीच्या पावसाचा मोठा फटका गेवराई तालुक्याला बसला आहे. सुरूवातीला चांगला पाऊस पडल्याने शेतक-यांनी महागडे बी-बियाणे खरेदी केले. पिक चांगले आले असतानाच पावसाने सर्व झोडपून काढले. त्यामुळे शेतकर्‍यांनी दुबार पेरणी केली. दुबार पेरणी केलेले पीक जोमात आले होते. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने परत हिसकावून घेतला.

गेल्या आठ दिवसात गेवराई तालुक्यात झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. तालुक्यात 1 लाख 8 हजार 369 हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. यातील तब्बल 1 लाख 2 हजार हेक्टरमधील पिकात पाणी साचले आहे. त्यामुळे संपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे. आणखी पाऊस सुरूच असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तलाठी, मंडळाधिकारी यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जावून नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ अहवाल द्यावा, अशा सूचना प्रशासनाने दिल्‍या आहेत.

हेही वाचा 

Back to top button