परभणी : विनयभंगातील आरोपीस एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा | पुढारी

परभणी : विनयभंगातील आरोपीस एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. गुरुवारी (दि.१३) येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. रुद्रभट्टे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षाच्यावतीने ॲड. उमाकांत फड यांनी बाजू मांडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, १ डिसेंबर २०१६ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास पीडित फिर्यादी तरुणी माहेरी घरी शिवणकाम करत असताना आरोपी माणिक रानबा कांबळे हा घरात घुसला. त्याने तरुणीला तुझे वडील व भाऊ कुठे गेले आहेत, अशी विचारणा केली. ते घरी नाहीत, असे सांगितल्यानंतर आरोपीने तरुणीचा विनयभंग केला. तरुणीने ओरडाओरड केल्यानंतर तरुणीची आई आणि नणंद पळत आली. त्यांनी आरोपीला हाकलले असता आरोपीने घरावर दगडफेक केली. त्यानंतर तक्रार देण्यासाठी पीडित तरुणी भावासोबत गंगाखेडला येत असताना आरोपीने रिक्षा अडवून तोडफोड करत नुकसान केले. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली.

याप्रकरणी आरोपी माणिक राणबा कांबळे याच्याविरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी न्यायाधीश एन. डी. रुद्रभट्टे यांनी आरोपीला एक वर्षाचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. उमाकांत फड यांनी बाजू मांडली. ॲड. पी. पी. सोळंके यांनी सहकार्य केले. कोर्टपैरवी अधिकारी म्हणून एएसआय वायुराज गुऱ्हाळे, पो. कॉ. मनोहर खोकले यांनी काम पाहिले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button