परभणी : गंगाखेड येथे ईद-ए- मिलादुन्नबीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम | पुढारी

परभणी : गंगाखेड येथे ईद-ए- मिलादुन्नबीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा: गंगाखेड शहरात आज (रविवार) महंमद पैगंबर जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलादुन्नबी) विविध सामाजिक उपक्रम पार पडले. शहराच्या प्रमुख मार्गावरून मुस्लिम समाज बांधवांनी जुलूस काढून समाजातील गोरगरीब १० जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा घेऊन सामाजिक एकतेचा संदेश दिला.

सकाळी ११ वाजता शहरातील तारू मोहल्ला येथून जुलूसास प्रारंभ झाला. जैंदीपुरा, भगवती चौक, दिलकश चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, डॉ. आंबेडकर चौक मार्गे चांदतारा व मस्जिद मार्गे रेल्वे स्थानक परिसरात जुलूसाचा समारोप झाला. या जूलूस मध्ये समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुपारी दोन वाजता रेल्वे स्थानकाशेजारील मैदानात मुस्लिम समाजातील १० जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. हुसन्नेन कमिटीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी हुसन्नेन कमिटीचे अध्यक्ष शेख मुक्रम, शेख शरीफ भाई, आयुब भाई अजमत खान पठाण, अब्दुल लाला, सय्यद इब्राहिम शेख रौफ, मोईज, रौफ खान, फिरोज खान, आरिफ खान सागर, पप्पू शेख, सय्यद जमीर, मुक्रम खान आदींसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button