बीड: काढणीला आलेल्या सोयाबीनला पावसाचा मोठा फटका | पुढारी

बीड: काढणीला आलेल्या सोयाबीनला पावसाचा मोठा फटका

नेकनूर(बीड), पुढारी वृत्‍तसेवा : बीड जिल्ह्यात गतवर्षी काढणीला आलेल्या सोयाबीनला पावसाचा मोठा फटका बसला होता. यावर्षीही हीच परिस्थिती निर्माण झाली असून दोन,तीन दिवसापासून काढनी सुरू होताच गुरुवारी रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली.

सोयाबीन गोळा करताना नेकनूर परिसरात शेतकऱ्यांचे हाल होत असून विघ्नाच्या माऱ्यातून वाचलेल्या पिकाला पावसाचा फटका बसला आहे. पेरणी होताच गोगलगाय, बहरात येताच यलो मोजेक यातून बचावलेल्या सोयाबीनला काढणीच्या वेळेस गुरुवारी रात्रीपासून आलेल्या पावासाने झोडपले.

शुक्रवारी दिवसभर रिपरिप सुरू असल्याने चिखलात अडकलेल्या सोयाबीनला गोळा करताना शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पाण्याचा निचरा नसलेल्या ठिकाणी सोयाबीन हाती लागण्याची शक्यता कमी झाली असून शेतकऱ्यांना पुन्हा या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. अजून तीन ,चार दिवस पावसाचा अंदाज सांगितला असल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.

हेही वाचा 

Back to top button