दापोडी : पंतप्रधान आवास योजनेकडे पालिकेचे दुर्लक्ष | पुढारी

दापोडी : पंतप्रधान आवास योजनेकडे पालिकेचे दुर्लक्ष

दापोडी : महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील गोरगरीब लाभार्थ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच, त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली जात आहे. ही योजना शहरातील आर्थिक दुर्बल घटक यासाठी आहे. परंतु, यामध्ये गोरगरीब लाभार्थ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. कोरोना कालावधीमध्ये अनेक जणांचे रोजगार गेले होते.

तसेच, कर्जाचे हप्ते थकल्यामुळे लाभार्थ्यांचा सिबील स्कोअर खराब झाला आहे. त्यामुळे कोणतीही बँक लाभार्थ्यांना कर्ज देत नाही. यासाठी महापालिकेकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही अद्यापही यावर कोणताही निर्णय झालेला नाही. आता जे लाभार्थी राहिले आहेत ते सर्व असंघटित कामगार आहेत.

महापालिका आयुक्तांना दिले निवेदन
घरे जाणार का? अशी धास्ती लाभार्थ्यांना आहे. महापालिकेने याबाबतीत लाभार्थ्यांप्रती सहानुभूती दाखवून बँकेशी लाभार्थ्यांच्या हिताचे धोरण ठरवून याबाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी पसिरातील नागरिक तुषार काशीद, उपाध्यक्ष सोमनाथ सूर्यवंशी, अजय गाडे, अलका कौद्रे, वंदना सूर्यवंशी यांनी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

Back to top button