नांदेड : सिंधी येथे पतसंस्थेवर भरदुपारी दरोडा, २ लाख ३० हजारांची रोकड लुटली | पुढारी

नांदेड : सिंधी येथे पतसंस्थेवर भरदुपारी दरोडा, २ लाख ३० हजारांची रोकड लुटली

उमरी; पुढारी वृत्तसेवा : उमरी (जि. नांदेड) तालुक्यातील सिंधी येथील कै. व्यंकटराव.पा. कवळे बिगर शेती पतसंस्थेच्या शाखेवर दरोडा टाकला. दुचाकीवरून तोंडाला रूमाल बांधून आलेल्या शस्त्रधारी दरोडेखोरांनी आज (दि१) दुपारी तीनच्या सुमारास दरोडा टाकला.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या सहा ते सात शस्त्रधारी दरोडेखोरांनी बँकेतील कर्मचार्‍यांना शस्त्रांचा धाक दाखवला. आणि रोखपालाजवळील २ लाख ३० हजारांची रोकड घेऊन पोबारा केला.

दरम्यान, यावेळी बँकेतील कर्मचार्‍यांनी दरोडेखोरांचा पाठलाग करून एकास पकडले.  पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासले. पकडलेल्या संशयिताचे  नाव मनजितसिंग किशनसिंग चिरमल्‍लीवाले (वय २६) असे आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button