औरंगाबाद : चाकूचा धाक दाखवून बैलांच्या व्यापाऱ्याकडील ४० हजार रुपये लुटले | पुढारी

औरंगाबाद : चाकूचा धाक दाखवून बैलांच्या व्यापाऱ्याकडील ४० हजार रुपये लुटले

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील चांगतपूरी परिसरात चौघांनी बैलांच्या व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून चाळीस हजार रुपये लुटल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील तुळजापूर येथील बैलाचे व्यापारी मोहसीन महमूद कुरेशी यांनी चांगतपुरी येथून एका शेतकऱ्याकडून बैल विकत घेतले होते. शुक्रवारी सायंकाळी चांगतपुरी येथे बैलांचे पैसे देण्यासाठी मोहसीन मोटर सायकलवरून जात होते. गावालगत असलेल्या कॅनल परिसरातील लक्ष्मी देवी मंदिराजवळ एका तरूणाने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. पण मोहसीन यांनी गाडी न थांबविल्याने त्या तरूणाने शिवीगाळ केली.

मोहसीन यांनी गाडी थांबवून याबाबत विचारणा करत असताना उसाच्या शेतात लपून बसलेल्या तिघांनी येऊन मोहसीन यांना मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील चाळीस हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच प्रभारी गंगापूरचे डीवायएसपी प्रकाश बेले यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

हेही वाचा :

Back to top button