बीड : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापतीकडून महिलेचा विनयभंग | पुढारी

बीड : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापतीकडून महिलेचा विनयभंग

युसूफवडगांव (बीड), पुढारी वृत्‍तसेवा : केज तालुक्यातील सादोळा येथील एक महिला शेतात आपल्या पतीकडे जात असताना एकाने त्या महिलेचा विनयभंग केला. आरोपी हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा माजी सभापती व सादोळा सेवा सहकारी सोसायटीचा नवनियुक्त चेअरमन आहेत.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही सादोळा येथे आपल्या पती, मुले व सासू साऱ्यासह शेती व मेंढपाळ व्यवसाय करून आपली उपजीविका करतो. गावातीलच संभाजी बब्रुवान इंगळे यांच्या घरी म्हैशीच्या दुधाचा रतीब लावलेला आहे. दि. 21 सप्टें रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास पती मेंढ्या शेतातून घरी घेऊन येणार असल्याने फिर्यादी महिला पतीच्या मदतीसाठी सादोळा ते भालगांव रोडने जात होती.

यावेळी गावातील संभाजी इंगळे याने मागून येवून कुठे चालली आहेस अशी विचारणा केली. यावेळी माझे पती शेतातुन मेंढ्या घेऊन येत आहेत म्हणून त्यांच्याकडे जात आहे, असे सांगितले. यानंतर संभाजी इंगळेने दुधाचे किती पैसे झाले असे विचारताच महिलेने मला घाई आहे. सकाळी घरी येऊन हिशोब करता येईल असे सांगितले. आणि ती महिला पुढे जाताच रस्ता अडवून तिला पकडत जवळ ओढले. महिला त्यास हिसका देऊन पुढे गेली असता पुन्हा तसेच केले.

दरम्‍यान, महिला घाबरत आपल्या पतीकडे धावत गेली. आपल्या पतीस झालेला प्रकार सांगितला. महिला आणि पती दोघांनी युसूफवडगांव पोलिस ठाण्यात याबात तक्रार दिली. तक्रारीवरून इंगळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

बीड जिल्ह्याची प्रतीक्षा संपली, नगर-आष्टी रेल्वेचा शुभारंभ 

पिंपरी : रिक्षाचालकाचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न, देहूरोड येथील घटना 

कलम ३७० हटवण्याच्या केंद्राच्या निर्णयाला आव्हान, सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाची सहमती 

Back to top button